Kadak Singh Trailer Pankaj Tripathi Sanjana Sanghi Kadak Singh Movie Trailer Release


Kadak Singh Trailer: आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये विशेष स्थान निर्माण करणारे अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे सध्या त्यांच्या ‘कडक सिंह’ (Kadak Singh) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील पंकज त्रिपाठी यांच्या अभिनायनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

पंकज त्रिपाठी यांचा दमदार अभिनय (Kadak Singh Trailer)

‘कडक सिंह’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठी हे एके श्रीवास्तव ही भूमिका साकारताना दिसत आहेत, एके श्रीवास्तवचा स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यामुळे त्याला बऱ्याच गोष्टी आठवत नाहीयेत, असं ट्रेलरमध्ये दिसत आहे. ‘कडक सिंह’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर हा अंदाज लावला जाऊ शकतो की हा चित्रपट क्राईम थ्रिलर असणार आहे.  ‘कडक सिंह’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या ट्रेलरमधील पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

कधी रिलीज होणार चित्रपट?  (Kadak Singh On OTT)

‘कडक सिंह’ हा चित्रपट  8 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. पंकज त्रिपाठी यांचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

पंकज त्रिपाठी यांनी कडक सिंह चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला त्यांनी कॅप्शन दिलं, “एक अपघात, चार कथा,एक अस्पष्ट सत्य कडक सिंह सत्य शोधू शकतील का? ट्रेलर आऊट!”

पाहा ट्रेलर:


‘कडक सिंह’ चित्रपटाची स्टार कास्ट (Kadak Singh Cast)

‘कडक सिंह’ या चित्रपटामध्ये या चित्रपटामध्ये  संजना संघीनं साक्षी श्रीवास्तव ही भूमिका साकारली आहे. तर पार्वती टीनं या चित्रपटात हेड नर्सची भूमिका साकारली आहे. ‘कडक सिंह’ चित्रपटातील नैना ही भूमिका जया अहसाननं साकारली आहे. तसेच या चित्रपटात दिलीप शंकर,परेश पाहुजा, वरुण बुद्धदेव  या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 

संबंधित बातम्या:

Kadak Singh Movie: “कहानियां कईं पर सच सिर्फ एक”; पंकज त्रिपाठींचा ‘कडक सिंह’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टरनं वेधलं लक्ष!

 

Source link

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *